अहमदनगर येथे इंजिनियरिंग प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन शिबिर संपन्न..किस्टोन स्कूल ऑफ इंजिनियरिंग पुणे आणि गवांदे मॅथ्स् क्लासेस च्या वतीने इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया मोफत मार्गदर्शन शिबिर अहमदनगर येथे यशस्वीरित्या संपन्न झाले.
सावेडी येथील माऊली संकुल मध्ये झालेल्या कार्यक्रमांमध्ये इंजिनिअरिंग मध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी त्यांना योग्य पर्याय निवडता यावा या उद्देशाने किस्टोन स्कूल ऑफ इंजिनियरिंग चे तज्ञ प्राध्यापक तुषार शिंदे यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन करताना किती फेऱ्या,प्राधान्य अर्ज भरताना घ्यावयाची काळजी ,योग्य महाविद्यालय आणि शाखा निवड, कमी गुण असताना चांगले महाविद्यालय कसे मिळवावे उपलब्ध जागा याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली .
कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित प्रमुख पाहुणे आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून इंजिनिअरिंग मध्ये करिअर करणारे विद्यार्थी आणि पालक यांना या स्तुत्य उपक्रमाने योग्य दिशा मिळेल विद्यार्थ्यांचे पुढील भविष्य उज्ज्वल असेल याबाबत मौलिक मार्गदर्शन केले.
प्रवेश प्रक्रिया मधील बारकावे, गुणवंत शाखेची निवड, गुणवत्तेतर महाविद्यालय निवड, करिअरच्या संधी, याबाबत विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला सर्वांगीण पैलू पाडण्यासाठी किस्टोन स्कूल कार्यरत असुन प्राचार्य डॉक्टर संदीप कदम यांनी अनमोल माहिती विशद केली.
यावेळी जिल्ह्यातून बहुसंख्येने विद्यार्थी पालक वर्ग उपस्थित होते, कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम प्राध्यापिका सोनाली मुरूमकर यांनी घेतले संयोजका तर्फे सर्वांचे आभार मानण्यात आले.