Saturday, May 25, 2024

‘दिलखुलास’मध्ये नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची ‘लोकसभा निवडणूकांची तयारी’ वर मुलाखत

‘दिलखुलास’मध्ये अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची

‘लोकसभा निवडणूकांची तयारी’ यावर मुलाखत

अहमदनगर दि.8 – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अहमदनगर जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी अहमदनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची मुलाखत घेतली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात सोमवार दि.१३ मे २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत मुलाखत प्रसारित होणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यात असलेले लोकसभा निवडणूक मतदार संघ, लोकसभा निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन, सर्व घटकातील मतदारांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधा या विषयी अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी माहिती दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles