Thursday, September 19, 2024

राजे शिवाजी पतसंस्थेचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे, आझाद ठुबेंसह १४ जणांच्या अडचणीत वाढ

पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील राजे शिवाजी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील आर्थिक अपहार समोर आला.त्यानंतर पारनेरसह जिल्ह्यात खळबळ उडाली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आझाद ठुबे, उपाध्यक्ष शमशुद्दीन हवालदार आणि कार्यकारी संचालक संभाजी भालेकर यांच्यासह १४ जणांवर पारनेर पोलिस ठाण्यात दि. २९ जुलै रोजी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दरम्यान आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. सदर प्रकरणाचा तपास आता पारनेर पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक एस. एन. शिंदे यांनी फिर्यादी बाळासाहेब वाळुंज यांच्यासह इतर ठेवीदारांना पुरवणी जबाबासाठी आज (दि. २८) अहमदनगर येथे बोलावले आहे.

आरोपींवर महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायदा अंतर्गत (एमपीडीए) व आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संबंधीची फिर्याद बाळासाहेब तुकाराम वाळुंज (वय ६०, रा. काकणेवाडी) यांच्यासह सहा ठेवीदारांनी दिली आहे.पारनेर पोलिसांनी अपहार प्रकरणी या पतसंस्थेची चौकशी सुरू केली होती. परंतु, आझाद ठुबे वगळता इतर १३ जण फरार आहेत. आता हे प्रकरण पारनेर पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.त्यामुळे या तपासात अधिक गती येईल अशी अपेक्षा ठेवीदारांना आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles