लोकनेत्या, मा.पंकजाताई मुंडे यांची मुंबई येथे मा.शिवाजीराव कर्डीले साहेब यांच्या समवेत सदिच्छा भेट घेतली.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पाथर्डी तालुक्यातील सर्वांचे श्रद्धास्थान आई मोहटादेवी गडावर नवरात्र उत्सव लाखो भाविकांच्या उपस्थित संपन्न होत असतो, या उत्सवासाठी ताईंना आमंत्रित केले. तसेच वांबोरी चारी टप्पा 2 च्या कामाच्या भूमिपूजनासाठी देखील उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.
या भेटीमध्ये ताईंसोबत विविध विकास कामांवर सखोल चर्चा झाली दरवेळी प्रमाणे ताईंचे मार्गदर्शन मिळाले ज्यामुळे भविष्यातील विविध प्रकल्पांची दिशा निश्चित करण्यात मदत होते.
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना मोहटादेवी गडावर नवरात्र उत्सवाचे निमंत्रण
- Advertisement -