लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर वेळोवेळी अत्याचार करणारा ६ महिन्यांपासून फरार आरोपी कोतवाली पोलीसांकडून जेरबंद
दि.०६/०३/२०२३ रोजी पिडीत महिला यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, सन २०१९ ते दिनांक २४/०२/२०२३ पावेतो यातील आरोपी नामे राजु उर्फ खुदाबक्ष मुस्ताक शेख रा. सर्जेपुरा अहमदनगर याने फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्या बरोबर वेळोवेळी शाररिक संबंध प्रस्थापित केले. तसेच फिर्यादीने त्याला लग्नबाबत विचारले असता त्याने तु परत लग्नाचा विषय काढायचा नाही असे म्हणुन फिर्यादीस शिवीगाळ करुन मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २२२ /२०२३ भा.द.वि. कलम ३७६ (२)(एन), ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्यापासुन यातील आरोपी फरार झालेला होता. तो त्याचे पाहुण्यांचे घरी म्युनसिपल कॉलनी, नालेगांव अहमदनगर येथे येणार असल्याची गुप्तबातमी कोतवाली पोलीसांना मिळाल्याने गुन्हे शोध पथकाच्या अधिकारी व अंमलदारांनी त्यास सापळा लावुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे सदर गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली. सदर आरोपीस तात्काळ पोलीस ठाणे येथे आणून अटक केली असून सदर आरोपीस आज दि. २८/०९/२०२३ रोजी मा. न्यायालय, अहमदनगर येथे रिमांडकामी रिमांड रिपोर्टसह हजर केले असता सदर आरोपीची पोलीस तपासकामी मा. न्यायालयाने ५ दिवस कस्टडी रिमांड दिली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई सुखदेव दुर्गे हे करत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोसई सुखदेव दुर्गे, पोहेकॉ तनवीर शेख, पोहेकॉ/ गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना सलीम शेख, पोकों अभय कदम, पोकों/संदिप थोरात, पोकों/ अमोल गाडे, पोकों/ सुजय हिवाळे, पोकों अतुल काजळे, पोकों रामनाथ हंडाळ यांच्या पथकाने केली आहे.