Saturday, March 2, 2024

iPhone 15 अतिशय कमी किमतीत खरेदीची सुवर्ण संधी…

iPhone 15
आयफोन 15 अजून घेतला नाहीये, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येतेय. विजय सेल्समध्ये 31 डिसेंबर 2023 पासून अॅप्‍पल डेज सेलला सुरुवात झालीये. यामध्ये नवीन आयफोन 15 हा 66,990 रुपयांच्या किंमतीत मिळणार आहे. तसेच आयफोन 15 प्लसची किंमत ही 75,820 रुपये इतकी असणार आहे.

अॅपल डेज सेलमध्ये अनेक आकर्षक डिल्‍स ग्राहकांना मिळणार आहे.तसेच विजय सेल्‍सच्‍या 130 पेक्षा अधिक रिटेल आऊट्लेट्सच्‍या व्‍यापक नेटवर्कमध्‍ये त्याचप्रमाणे त्यांच्या वेबसाईटवरही तुमच्या आवडत्या अॅपल डिवाईसवरील अनेक सूट मिळवण्याच्या संधीचा आनंद घेऊ शकता. हा सेल 7 जानेवारी 2024 पर्यंत असणार आहे. दरम्यान या किमतींमध्‍ये एचडीएफसी बँक कार्डवर जवळपास 4000 रुपयांच्या त्वरित सूटचा पर्याय देखील देण्यात आलाय.

आयफोन 15 प्रो व्हर्जन देखील भन्नाट ऑफर्स येणार आहेत. आयफोन 15 प्रो 1,22,900 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच आयफोन 15 प्रो मॅक्सची किंमत 1,46,240 रुपये इतकी असणार आहे. त्याचप्रमाणे एचडीएफसी बँकेच्या कार्डवरही जवळपास 3000 रुपयांची त्वरित सूट देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलीये. आयफोन 13 देखील 50,820 रुपयांच्या किंमतींमध्ये उपलब्ध होणार असून त्यावर देखील एचडीएफसी बँकेच्या कार्डवर जवळपास 1000 रुपयांची त्वरित सूट देण्यात येणार आहे.

Related Articles

1 COMMENT

Comments are closed.

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles