अरिहंत मोबाईल वर्ल्ड येथे आयफोन १५ सिरीजचे आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते शानदार लॉन्चिंग
ग्राहकांनी अक्षरशः रांगा लावून खरेदी केला आयफोन
नगर : जगप्रसिद्ध आय फोनची प्रत्येकालाच भुरळ असते. नवीन सिरीजच्या लॉन्च कडे ग्राहकांचे डोळे लागलेले असतात. नगरमधील वाडिया पार्क संकुलातील अरिहंत मोबाईल वर्ल्ड येथे आयफोन १५ ची नवीन सिरीज उपलब्ध झाली आहे. आ. संग्रामभैय्या जगताप यांच्या हस्ते या नवीन सिरीजचे शानदार लॉन्चिंग करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, मर्चंटस बॅंकेचे संचालक संजय चोपडा, विकीशेठ जगताप, अजित जगताप, आकाश रणशिंग, मुकुंद कसाने आदींसह ग्राहक उपस्थित होते. ग्राहकांनी लॉन्चीगवेळी मोठी गर्दी करून अक्षरशः रांग लावून आपल्या आवडत्या आयफोनची खरेदी केली.
आ.संग्राम जगताप म्हणाले, आयफोनची खूप मोठी क्रेझ आहे. प्रत्येकाला आपल्या कडे आयफोन हवा असं वाटतं.आता नवीन सिरीज अरिहंत मोबाईल वर्ल्ड येथे उपलब्ध झाल्याने नगरकरांना आयफोन खरेदी सहज आणि विश्वासाने करता येणार आहे. येथील विक्री पश्चात सेवा संपूर्ण नगर जिल्ह्यात नावाजली जाते.
अजित जगताप यांनी सांगितले की, आयफोन १५ , १५ प्लस, १५ प्रो आणि १५ प्रो मॅक्स अशी नवीन सिरीज उपलब्ध करून देण्यात आली आहे . फायनान्सवर शून्य डाऊनपेमेंट भरूनही २४ ईएमआयवर ग्राहकांना आयफोन खरेदी करता येणार आहे. गणपती उत्सव साजरा करताना मनपसंत आयफोन खरेदीचा ग्राहकांनी आनंद घ्यावा असे आवाहन जगताप यांनी केले.