iPhone 16…भारतासह जगभरात आयफोन 16 सिरीज लॉन्च झाली आहे. आयफोन 16 सिरिजच्या या नव्या फोनमध्ये अनेक दमदार फिचर्स आले आहेत. आयफोन 15, आयफोन 14 च्या तुलनेत या नव्या फोनमध्ये अनेक स्पेसिफिकेशन्स अपग्रेड करण्यात आले आहेत. सध्या आयफोन 16 सिरीजचे फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला प्री-ऑर्डर बुकिंग करावी लागणार आहे. फ्लिपकार्ट, अॅमोझॉन तसेच अॅपल स्टोअरवर ही प्री-ऑर्डर करता येईल. 20 सप्टेंबरपासून आयफोन 16 सिरीजचे फोन मिळण्यास सुरुवात होईल.
भारतात आयफोन 16 हा फोन 79900 रुपयांना मिळणार आहे. तर आयफोन 16 प्लस हा फोन 89900 रुपयांना मिळेल. आयफोन 16 प्रो हा फोन 1 लाख 19 हजार 900 रुपयांपासून पुढे मिळेल. तर आयफोन 16 प्रो मॅक्स हा फोन भारतीय बाजारात 1 लाख 44 हजार 900 रुपयांना मिळेल.