इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेतील युद्धाला आता आठ दिवस झाले आहेत. युद्धात आतापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. तर १० हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, इस्रायली सशस्त्र दलांना एक मोठं यश मिळालं आहे. इस्रायली वायूदलाने हमासच्या कमांडरला ठार केलं आहे.
इस्रायली वायूदलाने शनिवारी रात्री केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये हमासचा टॉप कमांडर बिलाल अल-कदरा ठार झाला आहे. वायूदलाने शनिवारी रात्री गाझा पट्टीतल्या हमासच्या अनेक तळांवर बॉम्बवर्षाव केला. गाजा पट्टीतल्या दक्षिण खान युनिस बटालियनवर केलेल्या हल्ल्यात बिलाल कदरा मारला गेला. बिलाल हा हमासच्या इस्रायलवरील हल्ल्यामागील सूत्रधारांपैकी एक होता.