Saturday, December 7, 2024

लोकसभेची चूक विधानसभेत नको युतीतला जागावाटपाचा प्रश्न सोडवा, पवार साहेब प्रचारालाही लागले!

लोकसभा निवडणुकीत जागा वाटपात उशीर झाल्याने छगन भुजबळ यांनी माघार घेतली होती. नाशिक लोकसभा मतदारसंघातून त्यांचं नाव चर्चेत होतं. त्यांच्या नावाची शिफारस खुद्द अमित शाहांनीच केली होती, असंही छगन भुजबळ म्हणाले होते. परंतु, नाव जाहीर करण्यात उशीर होत असल्याने प्रचाराला वेळ मिळणार नाही. परिणामी त्यांनी उमेदवारीच्या शर्यतीतूनच माघार घेतली आणि त्याजागी हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान, असा घोळ विधानसभा निवडणुकीत होऊ नये म्हणून छगन भुजबळांनी आत्ताच तिकिट वाटप जाहीर करा, असं महायुतीतील नेत्यांना सांगितलं आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना असं म्हटलंय.

छगन भुजबळ म्हणाले, “लवकरात लवकर युतीतल्या पक्षांनी एकत्र बसून तिकिट वाटपाचा प्रश्न सोडवावा. लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ काय ठरवायचं आहे ते लवकर ठरवा. कारण, आपण पाहत आहोत की पवार साहेब कामाला लागले आहेत. प्रचार सुरू झाला. तशा प्रचाराला सुरुवात करावी लागली. आपण तेच तेच करत बसलो चर्चेचं गुऱ्हाळ करत तर परत अडचणीत येऊ.”

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles