जिल्हावासीयांवर गणपती बाप्पांची कृपादृष्टी कायम असून मंगळवारी सलग पाचव्या दिवशी
जिल्ह्यात मागील आठवड्यात गुरूवार (दि.21) रात्रीपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाला सुरूवात झाली. यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर असल्याने खरीप हंगामातील पिकाला जीवनदायी ठरला आहे. यासह रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण तयार होत असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास शेतकर्यांसह नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
जिल्ह्याची सरासरी 78 टक्के
गेल्या चार दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्याच्या पावसाची सरासरी वाढत आहे. मागील जिल्ह्यातील पावसाची सरासरी 52 टक्के होती. त्यात चार दिवसांत मोठी वाढ होत रविवारअखरे पावसाची सरासरी 77.8 टक्के झाली आहे. यात सर्वाधिक पारनेर तालुका 96, नगर 92, शेवगाव आणि अकोले प्रत्येकी 90 टक्के असे आहे. तर सर्वात पावसाची सरासरी टक्केवारी 42, राहुरी 57 टक्के, राहाता 58, कोपरगाव 64, संगमनेर 66 अशी आहे. जिल्ह्यात पाच तालुक्याची टक्केवारी ही 90 टक्क्यांच्या पुढे आहे.