अल्लू अर्जूनचा ‘पुष्पा’ हा सिनेमा खूप गाजला. सिनेमाचा दुसरा पार्ट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. दरम्यान सिनेमातील पुष्पाबरोबर दिसणारा केशव म्हणजेच
अभिनेता जगदीश प्रताप बंदरी या अटक करण्यात आली आहे. हैद्राबाद पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. गर्लफ्रेंडला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचे आरोप त्याच्यावर करण्यात आलेत. या बातमीनंतर चाहते हैराण झालेत. अभिनेता जगदीश प्रताप बंदरी हा मागील काही काळापासून त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर राहत होता. 29 नोव्हेंबर रोजी त्याच्या गर्लफ्रेंडनं आत्महत्या करत जीवन संपवलं. गर्लफ्रेंडच्या आत्महत्येनंतर अभिनेता हादरून गेला. गर्लफ्रेंडच्या कुटुंबानं मुलीच्या आत्महत्येसाठी अभिनेता जगदीश प्रताप बंदरीला जबाबदार धरलं. अभिनेत्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी जगदीश प्रताप बंदरीला कलम 306 अंतर्गत ताब्यात घेतलं आहे.