10 रुपयावरून वाद विकोपाला…बस कंडक्टरने निवृत्त IAS अधिकाऱ्याला धुतला..व्हिडिओ

0
63

जयपूरमध्ये एका निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला बस कंडक्टरने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ७५ वर्षीय निवृत्त आयएएस अधिकारी आर.एल. मीना यांना आग्रा रस्त्यावरील कनोता बस थांब्यावर उतरायचे होते. मात्र, कंडक्टरने थांब्याची माहिती दिली नसल्याने बस पुढील थांब्यावर, नायला येथे पोहोचली. यानंतर कंडक्टरने श्री. मीना यांच्याकडे १० रुपये अतिरिक्त भाड्याची मागणी केली. मीना यांनी भाडे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर कंडक्टरने श्री. मीना यांना ढकलले. प्रत्युत्तरादाखल मीना यांनी कंडक्टरला थप्पड मारली. त्यानंतर कंडक्टर घनश्याम शर्मा यांनी निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण केली.

४४ सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये कंडक्टर अधिकाऱ्यांना सतत मारताना दिसत आहे.श्री. मीना यांच्या तक्रारीवरून कंडक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयपूर सिटी ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने कंडक्टर घनश्याम शर्मा याला गैरवर्तणुकीच्या आरोपाखाली निलंबित केले आहे. हा व्हिडिओ पाहून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून सार्वजनिक वाहतुकीतील प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


केंद्रिय अर्थमंत्री बजेटमध्ये पीएम किसान सन्मान निधी वाढवणार? शेतकऱ्यांना आशा