Saturday, December 9, 2023

धनगर बांधवांच्या मोर्चाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच धनगर आरक्षणाची मागणीही जोर धरु लागली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधवांकडून जालन्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला हिंंसक वळण लागल्याचे समोर आले असून आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालय तसेच परिसरातील वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात धनगर समाजाकडून महामोर्चा काढण्यात आला. गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभाही घेण्यात आली. मात्र निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश न दिल्याने मोर्चेकरांनी मोठा गोंधळ केला.

आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर धनगर बांधव सहभागी झाले होते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांना अडवण्यात आले. ज्यामुळे संतप्त आंदोलकांनी गेटवरुन चढून आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मोर्चेकरांकडून परिसरातील दुचाकींसह उपजिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेकही करण्यात आली.ज्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, यावेळी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप परिस्थिती नियंत्रणात आणली. आक्रमक मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी पांगवल्यानंतर परिस्थिती पुर्वपदावर आली. यावेळी आंदोलकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तसेच जर धनगर समाजाला एसटी प्रवर्गात सामाविष्ट केलं नाही; तर सरकारला सत्तेवरून खाली खेचू असा इशाराही यावेळी देण्यात आला

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d