मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. ते अन्न व पाणी देखील घेत नाहीत. दरम्यान त्यांची आज प्रकृती पुन्हा ढासळली आहे. त्यांच्या नाकातून रक्त येत आहे. त्यांनी सलाईनही लावण्यास नकार दिला आहे. त्यांनी पाणी प्यावं म्हणून लोक विनवणी करत आहेत. पण जरांगे पाटील ऐकायला तयार नाहीत. जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही, तोपर्यंत पाण्याच्या थेंबालाही हात लावणार नाही असं जरांगे यांनी सांगितलं.
काल जरांगे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना सलाईन लावण्यात आली होती. झोपेतच त्यांना सलाईन लावली होती. पण जाग येताच त्यांनी सलाईन काढून टाकली. आजही त्यांना अशक्त वाटत आहे. त्यांचे डोळे उघडत नाहीये. त्यातच पोटदुखीचा त्रासही वाढला आहे. पण जरांगे उपचार घ्यायला तयार नाहीत. पाणी प्यायलाही तयार नाहीत. त्यामुळे समाजबांधवांची चिंता वाढली आहे. सर्वजण त्यांना विनंती करत आहेत. पण जरांगे निपचित पडून आहेत.