मनोज जरांगे पाटील यांच्या नादी लागून कितीतरी तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. व्यवस्थेनं मराठा समाज आणि तरुणांमध्ये संभ्रम निर्माण केला असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे. लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. जरांगे यांनी पंकजा मुंडे आणि महादेव जानकर यांना पाडण्यासाठी बैठका लावल्याचा देखील हाके यांनी केला. हाके यांनी शरद पवारांवर सुद्धा टीका केली. पवार निवडणुका जिंकण्याचे फक्त मॅनेजमेंट गुरु असून त्यांनी इथले लोक सोबत घेतले असते, तर ते केव्हाच पंतप्रधान झाले असते असे देखील लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. यावेळी हाके यांनी मुख्यमंत्री झोपले आहेत. ते मीडिया बघत नाहीत, टीव्ही बघत नाहीत किंवा आंदोलन होत आहेत ते बघत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. हाके यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली. शरद पवार यांना आम्ही जाणता राजा म्हणायचो, पण आता ते निवडणुका जिंकायचे फक्त मॅनेजमेंट गुरु आहे. पहिल्यांदा शरद पवार लक्ष्मण माने, ना. धो महानोहर यांच ऐकायचे. मात्र, आता काही ऐकत नाहीत. त्यांनी इथल्या लोकांना बरोबर घेतल असतं, तर ते कधीच पंतप्रधान झाले असते. आठ पैकी त्यांचे किती ओबीसी उमेदवार आहेत, जे आहे ते फक्त नावाला असल्याची टीका त्यांनी केली.
पंकजा मुंडे आणि महादेव जानकरांना पाडण्यासाठी मनोज जरागेंनी बैठका घेतल्या..
- Advertisement -