मराठवाड्यात जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशीव मतदारसंघात ‘जरांगे फॅक्टर’ प्रभावी ठरला आहे. त्यामुळेच २५ वर्षांची दानवेंची जिल्ह्यातील सत्ता जनतेने उलथवून लावली. दुसरीकडे नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण आणि हिंगोलीत नागेश पाटील आष्टीकर यांनी विरोधी उमेदवारांना आस्मान दाखवले.
परभणी मतदारसंघात महाविकास आघाडीचे संजय जाधव विजयी झाले.जालना मतदारसंघात भाजपचे रावसाहेब दानवे यांना अनेक गावात मराठा आंदोलकांनी विरोध झाला होता. सत्ताधाऱ्यांच्या रोषातील एक लाखापेक्षा अधिक मतदान अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांच्याकडे वळूनही काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे मोठ्या मतांनी विजयी झाले.
नांदेड जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाण यांना गावबंदी केली होती. या मतदारसंघात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी झाले. हिंगोली मतदारसंघात महाविकास आघाडीचे नागेश आष्टीकर विजयी झाले.