Sunday, July 21, 2024

सरकारकडून आश्वासन मिळल्यानंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित..ओबीसी आरक्षणाला धक्का नाही

जालना: ओबीसी आरक्षणासाठी वडीगोद्री उपोषण करणारे लक्ष्मण हाके सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली.हाके गेल्या १० दिवासांपासून उपोषणाला बसले होते. शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर हाके यांनी आंदोलन स्थगित करत असल्याचे सांगितले. हे आंदोलन मागे घेतले नसून स्थगित केले आहे आणि यापुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असे देखील हाके म्हणाले. बोगस प्रमाणपत्र दिले गेले त्यावर आमच्या हरकती होत्या त्यावर श्वेतपत्रिका काढावी अशी आमची मागणी आहे. त्याच बरोबर पंचायत राजमध्ये आमच्या ५६ जागांचे आरक्षण गेले आहे. गेल्या ३ वर्षात हा खटला न्यायालयात सुरू आहे. याबाबत सरकार काही करणार आहे की नाही की पंचायत राजमधील जागा ओबीसी आरक्षणाशिवाय घेणार आहेत याचे उत्तर सरकारने आम्हाला द्यावे असे हाके यांनी उपोषण मागे घेताना सांगितले.आम्हाला सरकारकडून न्यायाची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles