जालना: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आगपाखड केली आहे. प्रत्येक आंदोलनात जरांगे वेगळी मागणी करत असून जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जीआर काढतो याची लाज वाटते असं म्हणत जरांगे तमाशातला सोंगाड्या आहे. जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या, यापेक्षा जरांगेंची लायकी नाही, असा टोला लक्ष्मण हाके यांनी लगावलाय. जालन्यातून ते बोलत होते.
जरांगेच काय जरांगेचा बाप जरी आला शरद पवार जरी आला तरी ओबीसीच्या आरक्षण संपू शकत नाही. असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी जरांगेंना चांगलच घेरल्याचं दिसून आलं. तुझ्या बॅनरवर तुतारीचं चिन्ह टाक आणि बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन कर असं हाके म्हणाले.
प्रत्येक आंदोलनाला वेगळी मागणी करत आहेत. ९६ कुळ्यांची भाषा करायची आणि आम्ही मागास असल्याचं म्हणायचं. असं म्हणत जरांगेंना तुमच्या बिगबॉस मध्ये घ्या अशी माझी बिग बॉसच्या लोकांना मागणी आहे. यापेक्षा जरांगेंची कुठेही लायकी नाही असे ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके म्हणाले. जरांगेच्या बॅनरवर फुले शाहू आंबेडकरांचा फोटो लागलेला दिसतो का?? असा सवालही त्यांनी केला. जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री जीआर काढतात याची लाज वाटते. हैदराबाद गॅझेट ,सातारा गॅझेट आणि बॉम्बे गॅजेट लागू करण्याची शासनाची हालचाल सुरू आहे हा अधिकार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी दिला. मुख्यमंत्र्याला कायदा कळतो का? असा सवालही त्यांनी केला.