राठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मागच्या सात दिवसांपासून उपोषण करत आहेत. जालन्यातील अंतरवली सराटीत त्यांचं उपोषण सुरु आहे. आज या उपोषणाच्या सातव्या दिवशी आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे अंतरवली सराटीमध्ये पोहचले आहेत. संभाजीराजे उपोषणस्थळी येत मनोज जरांगेंच्या तब्येतीची चौकशी केली आहे. या उपोषणस्थळावरून संभाजीराजे यांनी सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगेंना काही झालं तर सरकार जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे.
मनोज जरांगेंना काही झालं तर सरकार जबाबदार…संभाजीराजेंचा सरकारला इशारा
- Advertisement -