व्हायरल व्हिडीओ पाकिस्तानचा आहे. मिठाईच्या या दुकानात थ्रीडी प्रिंटर नोझलचा अनोखा वापर केला जातो आहे. या थ्रीडी प्रिंटरला एक पाईप जोडण्यात आला आहे. या पाईपमध्ये जलेबीचे पीठ आहे ; ज्याच्या मदतीने तेलात गोल गोल जिलेबी तयार केली जाते आहे. काही सेकंदात या हलवाईने कढईभरून जिलेबी तयार केलेली दिसत आहे ; सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ पहिला आणि रिपोस्ट करत लिहिले की, मान्य करतो की, मी तंत्रज्ञानाचा शौकीन आहे. पण, थ्रीडी प्रिंटर नोझलचा उपयोग करून जिलेबी बनवताना पाहून माझ्या मनात संमिश्र भावना निर्माण झाल्या आहेत. कारण – जिलेबी माझा आवडता पदार्थ आहे आणि हातात पीठ घेऊन जिलेबी तळणे आणि त्याला साखरेच्या पाकात सोडणे ही एक कला आहे. तर हा व्हिडीओ पाहून जसं मी विचार करतो आहे त्यावरून मला असे वाटते की, मी खूप जास्त जुन्या विचारांचा आहे ; अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिली आहे.https://x.com/anandmahindra/status/1760211353141186572?s=20
- Advertisement -