Wednesday, April 17, 2024

सुनेच्या उमेदवारीसाठी खडसेंनी ठाकरे, पवारांना धोका दिला… लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार…

जळगाव: अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी एक मोठा दावा केला आहे. काही दिवसांनी एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये जातील असा दावाच संजय पवार यांनी केला आहे. संजय पवार यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला होता. सुनेला खासदार करण्यासाठी एकनाथ खडसे यांनी उमेदवारी मागितली आणि पुन्हा उमेदवारी मागे घेण्याची खेळी खेळली. सुनेच्या उमेदवारीसाठी खडसे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना धोका दिला. त्यांना फसवलं. सुनेला भाजपकडून उमेदवारी मिळताच खडसे यांनी पळ काढला. मैदान सोडलं. नाथाभाऊ हे रणछोडदास आहेत, अशी जोरदार टीका संजय पवार यांनी केली.
मरेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहील असं एकनाथ खडसेंनी जाहीर करावं. हिम्मत असेल तर एकनाथ खडसेंनी रावेर लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी. खडसे यांनी स्वत:ला रावेरची उमेदवारी मागून घेतली. त्यांच्यासाठी शरद पवार गटाने जागाही सोडली. आता सुनेला उमेदवारी जाहीर होताच खडसे यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. एकाच घरात भाजपकडून सुनेसाठी खासदारकी आणि दुसरीकडे राष्ट्रवादीकडून आमदारकी नाथाभाऊंनी घेतली आहे. नाथाभाऊंनी एकाच हाताने दोन प्रसाद घेऊ नये. त्यांना ते शोभत नाही. काही दिवसांनी एकनाथ खडसे भाजपमध्ये जातील. त्यांची मुलगी रोहिणी खडसे या भाजपमधूनच विधानसभेची निवडणूक लढवतील, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles