Tuesday, May 28, 2024

उद्धव ठाकरेंच्या खेळीमुळे भाजपमध्ये अस्वस्थता… ‘या’ मतदारसंघात उमेदवार बदलण्यासाठी हालचाली…

जळगाव मध्ये विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर येथील राजकीय गणिते बदलली आहेत. भाजपाची धाकधूक वाढली आहे. अशा परिस्थितीत येथील उमेदवार बदलण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्याची माहिती आहे. या मतदारसंघात भाजपने उन्मेष पाटील यांना डावलून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या उन्मेष पाटील यांनी थेट ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाने येथे पाटील यांचे निकटवर्तीय करण पवार यांना उमेदवारी दिली.

ठाकरे गटाच्या या चालीने भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यामु्ळेच स्मिता वाघ यांच्याऐवजी ए टी पाटील यांना तिकीट देण्याचा विचार सुरू झाला आहे. ए टी पाटील यांनी नवी दिल्लीत भाजप नेत्यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles