Saturday, March 2, 2024

कॉंग्रेसची कारवाई… राज्यातील बड्या नेत्यांना पक्षातून केलं निलंबित…

लोकसभा तोंडावर असताना जळगावच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, त्यांच्या पत्नी डॉ. वर्षा पाटील, तसेच युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार पक्षाचे संघटन व प्रशासन उपाध्यक्ष नाना गांवडे यांनी याबाबतचे पत्र सोमवारी जारी केले आहे.

माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचं मोठं नाव आहे. गेल्या 30 वर्षांपासून ते पक्षात सक्रीय आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. जळगाव जिल्हा व खानदेशात काँग्रेसचा प्रमुख चेहरा होते. त्यांनी नुकतीच काँग्रेसतर्फे रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छाही व्यक्त केली होती, तर त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांनीही निवडणूक लढविण्याची तयारी केलेली आहे. मात्र त्यांनी कोणत्याही पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले नव्हते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles