राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे हे पुन्हा स्वगृही परतणार आहेत. येत्या 9 किंवा 10 एप्रिल रोजी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता रोहिणी खडसे काय करणार याची उत्सुकता होती. आता रोहिणी खडसे यांनी स्वतः त्यावर स्पष्टीकरण दिलं असून आपण शरद पवारांच्या सोबतच राहणार असल्याचं सांगितलं आहे.
कोणत्याही परिस्थितीत आपण भाजपमध्ये जाणार नाही, भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महिला प्रदेशाध्यक्ष असून पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असंही रोहिणी खडसेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे.