Sunday, December 8, 2024

लाच म्हणून रोख रक्कम आणि दारूचे २ खंबेही घेतले, ग्रामसेवक ‘एसीबी’च्या जाळ्यात

जालना जिल्ह्यातील बदनापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भूमिगत नालीच्या बांधकामाची रक्कम अदा करण्यास परवानगी देण्यासाठी ग्रामसेवकाने सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तसेच ब्लॅकडॉग दारूचे दोन खंबेही लाच म्हणून मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

बदनापूर तालुक्यातील मांजरगाव भूमिगत नाली बांधकाम करण्यात आले आहे. या कामाचे उर्वरीत 1 लाख 48 हजार 467 रुपयांचा निधी बांधकाम करणारे मजुरांना व बांधकाम साहित्य देणारे दुकानदार यांना अदा करावयाची होती. त्यासाठी परवानगी लेटरवर गट विकास अधिकारी, पंचायत समिती बदनापूर यांची सही घेण्याची गरज होती. ही सही देण्यासाठी आलोसे सिद्धार्थ घोडके यांनी 20 जून रोजी तक्रारदार यांना पंचासमक्ष 7 हजार रुपयांची लाचेची मागणी केली.

सदर गुन्ह्यात आलोसे सिध्दार्थ घोडके व ग्रामसेवक अंबुलगे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles