Friday, December 1, 2023

आमरण उपोषणाचा चौथा दिवस, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खूपच खालावली

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अन्न-पाणी सोडलय. त्यामुळे त्यांची प्रकृती खूपच खालावली आहे. नोज जरांगे यांनी डॉक्टरांकडून उपचार करुन घ्यायला नकार दिलाय. “सरकारने हे सहजतेने घेऊ नये, त्यांना जड जाईल. मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्या” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “माझी मराठा बांधवांना विनंती आहे, कोणी आत्महत्या करु नये तसच इतर कोणालाही जीवन संपवायला देऊ नका” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“उद्या 29 पासून दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषण सुरु होईल. पाणी घेऊन उपोषण करा. गावची गावं, उद्या एकजुटीने एकत्र बसा. आमरण उपोषणाला मोठ्या संख्येने मराठा समाज बसणार आणि हे देशातील मोठे आंदोलन असणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन 31 तारखेला ठरणार” अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. “सर्व उपोषणाला बसल्यानंतर कोणाच्या जीवाला धोका झाला, तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सरकारची जबाबदारी असेल” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: