मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केलेली आहे. त्यासाठी मनोज जरांगे यांनी अनेकदा उपोषण केलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत उपोषण सुरु केलं आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासह आदी मागण्या मनोज जरांगे यांनी केलेल्या आहेत.
अमित शाह आमच्या प्रश्नांकडे कशाला लक्ष घालतील? ते मोठे लोकं आहेत, त्यांना आमची गरज नाही. जे मोठे आहेत त्यांना हे धरुन राहणार आहेत. ते शिर्डीला आले तेव्हाच त्यांनी म्हटलं होतं तुम्ही लक्ष घाला ते काहीही बोलले नाहीत. लोकांचे मुडदे पाडणारे लोक आहेत, त्यांचा चेहरा माणसाचा आहे पण आतून कपटाने भरलेले लोक आहे. त्यांचं काही खरं नाही. ते गरीबाला कधीही मोठं करु शकत नाही. त्यांना देशातल्या मोठ्या जाती संपवायच्या आहेत. महाराष्ट्रात मराठा मोठी जात आहे ती संपवायची आहे”, असा आरोप जरांगे यांनी केला.