Wednesday, February 28, 2024

अन्नपाणी सोडलं… उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटीलांची प्रकृती खालावली…

मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये अमरण उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी या गेल्या तीन दिवसांत पाण्याचा थेंब देखील घेतला नाही. तसेच, उपचार घेण्यासाठी देखील जरांगे यांनी नकार दिला आहे. त्यामुळे कालपासून त्यांची तब्येत देखील खालावली आहे.

प्रशासनाच्या वतीने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक देखील रविवारी आंदोलनास्थळी दाखल झाले होते. मात्र, जरांगे यांनी उपचार घेण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. जरांगेंच्या याच भूमिकेमुळे आता सरकारची अडचण वाढली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles