Wednesday, February 28, 2024

अध्यादेश कॅन्सल होऊ दे मग तुझं मंडल कमिशनचं चॅलेंज करतो… जरांगेंचा भुजबळांवर पलटवार…

नगर येथे झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांवर सडकून टीका केली होती. याला आता मनोज जरांगेंनी यावर प्रत्युत्तर दिलं आहे. भुजबळांवर एकेरी भाषेत टीका करत जरांगे म्हणाले, अध्यादेश आणि मसुदा यातला फरक तुला कळत नाही तर कशाला मंत्री राहतो? आम्ही ओबीसीत घुसलो हाच तुझा आम्ही किती मोठा जोक केला, असा टोला जरांगेंनी लगावला आहे.

जरांगे म्हणाले, ‘अध्यादेश आणि मसुदा यातला फरक तुला कळत नाही तर कशाला मंत्री राहतो रे? अध्यादेश कॅन्सल होऊ दे मग तुझं मंडल कमिशनचं चॅलेंज करतो. मग तुला कळेल मागचा आणि पुढचा दरवाजा कसा असतो ते. आता याला न्हाव्यांचं वाटोळं करायचं आहे का? मराठे त्यांच्या दुकानात गेले नाही तर मग त्यांनी काय खायचं? आम्हाला ओबीसीचं वाटोळं करायचं नाही, तुझ्या एकट्यामुळे मंडल कमिशन उडणार’
भुजबळांच्या राजीनाम्यावर बोलताना जरांगे म्हणाले, तू राजीनामा दे नाहीतर समुद्रात उडी हाण. आम्हाला तुझं काय करायचय? तुला सगळ्यांनी साईडलाईन केलंय, असा टोला जरांगे यांनी लगावला. मराठ्यांनी एकमेकांची भादरावी या भुजबळ यांच्या टिकेवर देखील जरांगेंनी भुजबळ यांना टार्गेट केलं. आता याला त्यांचं वाटोळं करायचं आहे का? मराठे त्यांच्या दुकानात गेले नाही तर मग त्यांनी काय खायचं? असा सवाल जरांगे यांनी केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles