Home राज्य जलसंपदा विभागात नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती सुरु

जलसंपदा विभागात नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती सुरु

2

जलसंपदा विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत जाहिरात महाराष्ट्र शासन, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंत्रा श्रेणी २/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता या पदासाठी भरती जाहीर केली आहे.या पदासाठी सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी वयोमर्यादा ६५ वर्ष निश्चित करण्यात आली आहे. जलसंपदा विभागातील या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.जलसंपदा विभागात नोकरी करुन सेवानिवृत्त झालेले लोक या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. छत्रपती संभाजी नगर पाठबंधारे विभागात भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड १ वर्षांच्या कालावधीसाठी केली जाणार आहे.या नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना मुलाखतीबाबत ईमेलवर माहिती दिली जाईल.

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी कार्यकारी अभियांता, नांदूर मधमेश्वर कालवा विभाग क्रं २, मुख्यालय छत्रपती संभाजी नगर, जलसंपदा विभाग येथे पाठवायचा आहे.सध्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. रिसर्च असोसिएट पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ३५ वर्षे असावी. या नोकरीसाठी निवड झाल्यास उमेदवारांना ५८००० रुपये पगार मिळणार आहे.

2 COMMENTS

Comments are closed.