बीडमधील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीमध्ये ठेवी ठेवल्याने फसवणूक झालेल्या जामखेडमधील ठेवीदारांनी रमेश आजबे, संदीप गायकवाड, वसीम सय्यद, सागर कोल्हे, काका कोल्हे आदी पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढून ठेवीदारांच्या मागणीकडे लक्ष वेधलं. याप्रश्नी आमदार रोहीत पवार यांनीही राज्यपाल आणि गृहमंत्री फडणवीस यांना निवेदन देऊन ज्ञानराधासह इतरही संस्थांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची आणि ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. सरकारने कुणालाही पाठीशी न घालता सामान्य ठेवीदारांना न्याय द्यावा, ही विनंती!
- Advertisement -