Saturday, October 5, 2024

गणेश विसर्जन मिरवणुकीत रोहित पवार, राम शिंदेंचा डान्स, पण आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाचे विसर्जन फिक्स? जामखेडकरांमध्ये चर्चा…

जामखेड – जामखेड गेले १० दिवस भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या हजारो भाविकांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपले लाडके दैवत असलेल्या विघ्नहर्ता विनायक श्रीगणेशाचे शहर व परिसरात उत्साहात विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्रीगणेशाचे मोठ्या जल्लोषात विसर्जन करण्यात आले. जामखेड शहरात मोठया मंडळाचे १४ व लहान मंडळाचे १० असे २४ तर एक गाव एक गणपती १० व ग्रामीण भागात एकुण ५५ मंडळाची म्हणजे एकुण ८९ मंडळांची श्री . ची . स्थापना करण्यात आली होती . सातव्या दिवसापासुन शहर व तालुक्यात गणेश विसर्जन करण्यास सुरुवात झाली होती . दहाव्या दिवशी शहरातील१४ व ग्रामीण भागातील १७ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभात घेतला होता . विसर्जन मिरवणूक तब्बल ८ तास चालली. शेवटच्या मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन रात्री १२.५ मिनिटांनी झाले . प्रचंड जल्लोषात संघर्ष तरुण मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक निघाली होती. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली.
मेनरोड परिसरात आबालवृद्धांची एकच गर्दी झाली होती. सायंकाळी शहरातील सर्व रस्ते मिरवणुकानी फुलून गेले होते बाळगणेश मंडळानी सकाळी चारचाकी हातगाड्यामधून मिरवणुका काढल्या दुपारी काही काळ ओस पडलेले जामखेड शहरातील रस्ते सायंकाळी मिरवणुकीच्या गर्दीने फुलून गेले होते तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड दांडगा उत्साह दिसून आला दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही सार्वजनिक गणेश
मंडळाचे प्रमाण असून, ढोल-ताशा लेझीम फड ढोलीबाजा-बेन्जोबाजा अशा विविध वाद्यांच्या गजरात गल्लोगल्लीतील, चौकाचौकातील गणपतींची ट्रॅक्टर, टेम्पो, मोटारीतून मिरवणूक काढण्यात आली गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने शहर व परिसर दणाणून गेले या मिरवणुकीमुळे शहरातील सर्वच रस्ते गुलालाने मास्थून निघाले. सार्वजनिक मंडळांनी केलेल्या मंदिराच्या कलाकुसरींनी जामखेड शहर उजळून निघाले होते गणेशमूर्ती घेऊन निघालेल्या सार्वजनिक मंडळांच्या भव्य मिरवणुकांनी
जामखेडमधील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत
मेनरोड गजबजून गेला होता. हा सारा परिसरच जणू गणपतीमय होऊन गेला होता. भगव्या टोप्या, प‌ट्ट्या, डोक्यावर मिरवणारे आणि गुलालाने माखलेले हजारो आबालवृद्ध वाद्यमेळाच्या तालावर बेभान होऊन नाचणारे तरुण दिसत होते. दरवर्षी प्रमाणे नगरसेवक अमित चिंतामणी व मित्र मंडळाने गणेश मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांचा सत्कार आमदार राम शिंदे ; प्रा . मधुकर राळेभात ; सभापती शरद कार्ले ; माजी सभापती डॉ .भगवान मुरूमकर व अमित चिंतामणी यांनी केला . तसेच मोठ्या हौसेने या वर्षी आमदार रोहित पवार यांनी मेनरोड वर स्टेज उभारून सर्व गणेश मंडळ यांचे सत्कार त्यांनी केले .

गणरायाचे विसर्जन पाहण्या- साठी जामखेडकरांची मेनरोडवर गर्दीची लाट पसरलेली होती. मेनरोडमध्ये राहणारे नागरिक घराच्या गॅलरीतून एक विलोभनीय चित्र पाहत होते.

*दोन्ही आमदारांनकडून संघर्ष मित्र मंडळाचे* *कौतुक*
अनेक वेळा संघर्ष मित्र मंडळाने गणेश उत्सव काळात प्रथम क्रमांकाचे पारितोषीक घेतले आहेत . या वर्षी मंडळाची पहिल्या दिवशाची आरती आमदार राम शिंदे यांनी केली तर विसर्जन मिरवणुकीची आरती आमदार रोहित पवार यांनी केली .
शहरातील गणेशोत्सवाचे आकर्षण असलेल्या संघर्ष मित्रमंडळाची मिरवणूक आकर्षक होती.
गणपती विसर्जन मिरवणुक अगदी शांततेत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली . यावेळी दोन्ही ही आमदारांनी संघर्ष मित्र मंडळांचे कौतुक केले.

*दोन्ही आमदार थिरकले !*
*2024 च्या विनासभेत एकचं तरी विसर्जन* *होणार : जामखेडकर*

जामखेड शहरातील विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे गाण्याच्या ताळावर बेभानपणे थिरकले होते .
विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांचे स्वागाताचे स्टेज स्वतंत्र होते . परंतु नाचण्यात सुद्धा दोघांची स्पर्धाच दिसत होती . यावेळी ही जणू विधान सभेची विसर्जन मिरवणुक तर नाही ना ? 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत एकाचं तरी विसर्जन होणार असं जनतेतं चर्चेचा विषय चर्चीला जात होता .

कोणताही गंभीर व अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस निरीक्षक श्री. महेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता . गणेश विसर्जनाचा सोहळा शांततेन व उत्साहात पार पडला .

*प्रतिनिधी नासीर पठाण सह पत्रकार आशोक* *निमोणकर जामखेड*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles