जामखेड: खर्डा येथे आयोजित ‘मान नात्याचा भाऊ-बहिणीं’च्या रक्षाबंधन समारंभात आमदार प्रा. राम शिंदे यांनी विरोधकांवर कडवे टीकास्त्र सोडले ‘लाडकी योजना बंद पडावी’ म्हणून खोटी अफवा पसरवणाऱ्या सावत्र भावांना आगामी विधानसभा निवडणुकीत घरीच बसवले जाईल असे ते म्हणाले.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’च्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याच्या वितरणानंतर त्यांनी महिलांशी संवाद साधला. आ. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार महिलांना न्याय देण्यास कटिबद्ध आहे.
महायुती सरकारने रेशन दुकानावर मोफत धान्य, महिलांना वर्षातून तीन मोफत सिलेंडर आणि आनंदाचा शिधा यासारख्या योजनांचा लाभ दिला आहे. आगामी काळात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत वाढवून तीन हजार रुपये करण्यात येईल असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या समारंभात महिलांना राख्या बांधून सत्कार करण्यात आला आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने साड्यांचे वाटप केले गेले.
काही पण करा शेवटी निवडून रोहित दादा च येणार