मराठा आरक्षणासाठी रविवारपासून
रणरागीणी मैदानात, जामखेड बससेवा बंद
– – – – – – – – – – – – – – – – – –
जामखेड – संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणाची पूर्तता करण्यासाठी 24 ऑक्टोबरची मुदत दिली होती. मात्र यावर तोडगा न निघाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले असून रविवार दिवस होत आहे. त्यांनी पाच दिवसापासून अन्न व पाण्याचा त्याग केला आहे. त्या दिवसापासून जामखेड मध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषण सुरू केले आहे. रवीवारी मराठा क्रांती मोर्चाच्या महीला बाहेर पडल्या व त्यांनी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले व एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन तहसील परिसर दणाणून सोडला आहे. दरम्यान जामखेड बस आगाराने एसटी बसेस सेवा बंद केल्या असल्याने प्रवाशांचे हाल झाले आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधुन आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंतरवली सराटा येथे मनोज जरांगे पाटील यांनी 25 आँक्टोबर पासून उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी जामखेडमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवार पासून साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावातील मराठा बांधव एक दिवस या साखळी उपोषणात सहभागी होणार असून जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुटत नाही तोपर्यंत ते चालू राहणार आहे. असे जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. तसेच जामखेड शहर व संपूर्ण तालुक्यात राजकीय पक्षांच्या पुढचा-यांना गावबंधी करण्यात आली आहे. तसेच फलक प्रत्येक गावात लावण्यात आले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या रणरागीणी रविवारी घरातून बाहेर पडल्या त्यांनी एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला व साखळी उपोषणास बसल्या. महिलांच्या उपोषणामुळे आरक्षण बाबत मराठा समाज आक्रमक झाला आहे.
दोन दिवसात आरक्षण न दिल्यास गाठ मराठ्यांशी – कु. अस्मिता वराट
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसाचा अल्टीमेट दिला होता पण सरकारने शब्द पाळला नाही. जरांगे पाटील दुसर्यांदा उपोषणाला बसले त्यांनी अन्न व पाण्याचा त्याग केला आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे आम्ही महिला भगिनी मैदानात उतरल्या आहोत. सरकारने दोन दिवसात आरक्षण न दिल्यास गाठ मराठ्यांशी आहे असा इशारा दिला आहे.
प्रतिनिधी नासीर पठाण सह पत्रकार अशोक निमोणकर जामखेड
Video