मोटारसायकल आडवुन शेतकर्यास पावनेदोन लाखांना लुटले , चौघांवर गुन्हा दाखल
जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )
जामखेड -शेतकर्याने जामखेड येथे कांदा विकुन आलेल्या कांद्याच्या पट्टीचे पैसे आपल्या गावी घेऊन जात असतानाच जामखेड करमाळा रोडवरील चुंबळी फाट्याजवळ पाठीमागून दोन मोटारसायकलवर आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी या शेतकर्याची मोटारसायकल आडवुन, दगडाने मारहाण करत मोबाईलसह त्यांच्या जवळील १ लाख ६४ हजार रुपयांना लुटले.
ही घटना सोमवार दि १५ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आसल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चार अज्ञात चोरट्यांन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की फीर्यादी विकास दत्तु मलंगणेर वय ४५ वर्षे रा. नान्नज यांनी पंधरा दिवसापुर्वी शेतातील काढलेला कांदा जामखेड येथील एका ट्रेडर्सच्या दुकानात घातला होता. यानंतर शेतकरी विकास मलंगणेर हे काल सोमवार दि १५ रोजी या कांद्याचे पैसै आनण्यासाठी जामखेड येथे आले होते. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे जोडीदार अशोक महादेव मोहळकर हे देखील होते. मलंगणेर यांनी कांद्याच्या पट्टीचे १ लाख ६० हजार रुपये घेऊन शर्टच्या आतील भागात ठेऊन ते जोडीदारा सोबत मागे मोटारसायकलवर बसुन आपल्या नान्नज गावी चालले होते.
याच दरम्यान पाळत ठेऊन आसलेल्या चौघा अज्ञात चोरटय़ांनी त्यांच्या दोन मोटारसायकलवरून या शेतकर्यांचा पाठलाग सुरू केला. यावेळी फीर्यादी यांची मोटारसायकल जामखेड करमाळा रोडवरील चुंबळी फाट्याच्यावर आली असता यातील चोरट्यांनी त्यांची मोटारसायकल अडवली व फीर्यादीस व जोडीदारास दगडाने मारहाण करत फीर्यादीच्या शर्टाच्या आत मध्ये ठेवलेले १ लाख ६० हजार रुपये व ४ हजार रुपये किमतीचा १ लाख ६४०० हजार रुपयांचा ऐवज हीसकावून घेऊन घटनास्थाहुन मोटारसायकलवरून पळुन गेले. या घटनेत फीर्यादी व सोबत आसलेले अशोक महादेव मोहळकर हे कीरकोळ जखमी झाले.
या प्रकरणी तातडीने फीर्यादी शेतकरी विकास मलंगणेर यांना जामखेड पोलीस स्टेशनला धाव घेत घडलेला प्रकार पोलीसांना सांगितला. यानंतर फीर्यादी विकास मलंगणेर यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून चार अज्ञात चोरट्यांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गौतम तायडे हे करत आहेत.
भरदिवसा सायंकाळी सहा वाजता शेतकर्यास लुटण्याची घटना घडली आसल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पुर्वी देखील काही वर्षापुर्वी देखील भरदिवसा जामखेड कुसडगाव रोडवरील काजेवाडी तलावाजवळ एका सोन्याच्या व्यापाऱ्यास लुटले होते. जामखेड तालुक्यात भरदिवसा चोरी व लुटमारीच्या घटना वारंवार घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या चोरट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी नागरीक करत आहेत.