Saturday, December 7, 2024

पुढचा आमदार मीच आहे… रोहित पवारांनी राम शिंदेंना ठणकावले…

जामखेड तालुक्यातील कुसडगावचे SRPF प्रशिक्षण केंद्र भाजपच्या काळात बाहेर जाणार होते. पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रशिक्षण केंद्र पुन्हा जामखेड तालुक्यात आणल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलं. यावेळी आमचे विरोधक (राम शिंदे) बिस्कीट खात बसल्याचा टोलाही रोहित पवारांनी लागवला. आम्ही कधीही सुडाचे राजकारण करत नाही आणि आमच्याबाबत सुडाचे राजकारण कोणी करत असेल तर त्याला सोडतही नाही असेही रोहित पवार म्हणाले.

पुढचा आमदार मीच होणार असल्याचा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.

मी माझ्या मतदारसंघातील लहान बहीण-भावांना चॉकलेट,आणि शालेय साहित्य देतो. मला मन आहे भावना आहे म्हणून मी देतो, पण माझे विरोधक त्यावरूनही टीका करतात. पण तुम्हाला भावना नाही त्याला मी काय करु असेही रोहित पवार म्हणाले. मी कर्जत-जामखेडचा सेवक आहे. कर्जत-जामखेडच्या लोकांना हे लोक घाबरतात असेही ते म्हणाले. SRPF केंद्राबाहेर गेलो तर पोलीस विनंती करत होते हे लोक ऐकणार नाही तुम्हीच त्यांना सांगा. मी ईडी कार्यालयात गेलो तेंव्हा पण कर्जत- जामखेडचे लोक कार्यालयाबाहेर जमा झाले होते. ED कार्यालयात गेलो तर मला पहिला प्रश्न विचारला बाहेर आलेले लोक कुठून आलेत. त्यांना वाटलं तासभर हे लोक थांबतील पण लोक थांबले नाहीत. ED वाले देखील म्हणाले “मान गये बॉस” असे रोहित पवार म्हणाले. ही कर्जत-जामखेडच्या लोकांची ताकद आहे, म्हणून मी दिल्लीपुढे झुकणार नाही. त्यांच्यापुढे हाच प्रश्न असतो की याला थांबवायचे कसे असे रोहित पवार म्हणाले.
आमदार रोहीत पवार म्हणाले,
कर्जत-जामखेड मतदारसंघाची नवी ओळख ज्यामुळं झाली त्यापैकी कुसडगाव (ता. जामखेड) येथील #SRPF केंद्राचं लोकार्पण केलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या केंद्राला मंजुरी दिली होती आणि त्यांच्या उपस्थितीमुळं लोकार्पणाच्या या कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली. केवळ मला श्रेय मिळेल म्हणून लोकार्पणाचा हा कार्यक्रम होऊ नये यासाठी स्थानिक अहंकारी नेत्याच्या सांगण्यावरून सरकारने शेकडो पोलिसांचा बंदोबस्त गेटवरच लावला पण स्वाभिमानी कर्जत-जामखेडकरांनी या अहंकाराला गाडून खणखणीत कामाचं दणदणीत लोकार्पण केलं.

यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्जत-जामखेडकर नागरीक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles