*मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी* *करता खर्डा येथील* *तरुण संतोष साबळे चढला मोबाईल* *टॉवर वर … शोले स्टाईल आंदोलन करत सरकारला इशारा
…
जामखेड
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी करता जामखेड तालुक्यातील खर्डा येथील संतोष साबळे या तरुणाने थेट मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही अशी भूमिका संतोष साबळे या तरुणाने घेतली आहे. त्यामुळे सर्व प्रशासन आता चांगलेच कामाला लागले आहे ही घटना कळताच खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ या टॉवर शेजारी धाव घेतली असून या तरुणाला खाली उतरण्याचे प्रयत्न सध्या प्रशासनाच्या वतीने सुरू आहेत.
प्रतिनिधी नासीर पठाण सह पत्रकार आशोक निमोणकर जामखेड .