रत्नदीप मेडिकल फौंडेशनच्या संदर्भात आ. राम शिंदे यांची उच्चस्तरीय चौकशीसाठी लक्षवेधी मुश्रीफ यांनी उच्चस्तरीय समिती ———————————————-
जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )
जामखेड – रत्नदीप मेडिकल फौंडेशन रत्नापूर तालुका जामखेड या संस्थेच्या बिएचएमएस व बिएससी नर्सिग विद्यार्थी वगळता इतर पाच कॉलेज च्या विद्यार्थ्यांचे स्थलांतर चार महिन्यांपासून झाले नाही. संस्थेच्या परिसरात हरीण पाळले व एक हरीण मृत पावले ही अतिशय गंभीर बाब आहे या सर्व प्रकरणाची शासकीय स्तरावरून उच्चस्तरीय चौकशी मागणी आ. राम शिंदे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी उपस्थित करून मांडली. त्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या सर्व प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशीची मागणी मान्य केली. आ. राम शिंदे यांनी विधानपरिषदेत रत्नदीप मेडिकल फौंडेशन रत्नापूर ता. जामखेड या संस्थेच्या एकाच इमारतीत बिएचएमएस, बिएएमएस,बिएससी नर्सिग कॉलेज, बि फॉर्मसी, डि फॉर्मसी, जिएएनएम, एएनएम अशा प्रकारे सात कॉलेज चालवले जातात. या संस्थेत महाविद्यालयीन काही विद्यर्थीनीचे शाररीक, माणसिक,अर्थिक,लैंगिक पिळवणूक झाली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी ५ मार्च पासून जामखेड तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी चौकशी समिती नियुक्त केली. व कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. २०२४ पासून या संस्थेच्या सर्व शैक्षणिक परवानगी रद्द करण्याचा निर्णय घेतला व विद्यार्थांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली आहे असे वैद्यकीय विभागाने म्हटले आहे. रत्नदीप मेडिकल फौंडेशन संस्थेच्या बाबतीत आंदोलन करून चार महीने झाले परंतु बिएचएमएस व बिएससी नर्सिंग वगळता इतर विद्यार्थ्यांचे स्थलांतर झाले नाही. तसेच संस्थेने विद्यार्थ्यांकडून घेतलेले पैसे परत दिले नाही त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी २७ एप्रिल पासून पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे तात्काळ स्थलांतर करावे अशी मागणी आ. राम शिंदे यांनी करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. ती मागणी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मान्य केली. लक्षवेधी चर्चेत भाग घेताना आ. मनिषा कायंदे यांनी एखादे कॉलेज चालू करताना विविध प्रकारच्या समिती येऊन विविध सेवा, सुविधा आहेत का याची पाहणी करून मुल्यांकन केले जाते. हे समिती सदस्य येतात खोटे रिपोर्ट दिले जातात या सर्वावर कारवाई होणार का ? या कॉलेज मधील मुलीचा प्रश्न गंभीर आहे. याबाबत गुन्हे दाखल झाले व ते जामीन घेऊन बाहेर आले ते प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करणार याकडे गृहखात्याचा वॉच असणार आहे का तिसरी गोष्ट त्या कॉलेजच्या आवारात हरीण फिरतात याबाबत व्हिडिओ आहेत याबाबत वेगळा गुन्हा दाखल करणार आहेत का? असा प्रश्न विचारला असता याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या संस्थेच्या आवारात अनेक घटना घडल्या आहेत. अनेक परवानग्या दिल्या आहेत तसेच हरीणचा प्रश्न आहे या सर्व बाबत उच्चस्तरीय समिती सखोल चौकशी करील असे आश्वासन दिले. चौकट एसआयटी मार्फत चौकशीची मागणी जामखेड तहसील कार्यालया समोर शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले व रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे विद्यार्थी आंदोलन करीत आहेत शनिवारी या ठिकाणी विद्यापीठाच्या समिती आल्या होत्या त्यांनी आपली बाजू मांडली या संस्थेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी आंदोलन कर्त्यांनी केली आहे.
रत्नदीप मेडिकल फौंडेशनची उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी… आ.राम शिंदेंच्या लक्षवेधीवर मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा
- Advertisement -