Saturday, September 14, 2024

माझ्यासोबत रहा नाहीतर तुझे व्हॉटसप व्हीडिओ कॉल रेकॉर्डींग व्हायरल करेल, महीलेवर अत्याचार, एकजणावर गुन्हा दाखल

जामखेड पोलीस स्टेशनला महिलेवर अत्याचार प्रकरणी एकजणाविरोधात गुन्हा दाखल .

जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )

जामखेड – जामखेड शहरातील घटना तू माझ्यासोबत चल तसेच तू माझ्यासोबत राहा अन्यथा मी तुझ्या सोबत केलेले व्हाट्सअप व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करेल, अशी धमकी देऊन महिलेस मारहाण करून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार केल्याप्रकरणी एक जणाविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की आरोपी मनोज भगवान अब्दुले वय 40 वर्षे, रा. सदाफुले वस्ती ,जामखेड याची मे 2024 रोजी पिडीत महीले सोबत ओळख झाली होती. त्यामुळे आरोपी आणि महीलेचे फोनवर बोलाने चालु झाले. यानंतर काही महीन्यांनी आरोपी हा पिडीत महीलेला आपण लग्न करु आसे म्हणत होता. मात्र महीलेचे पुर्वी लग्न झाले होते. ती सहा महीन्यांपासून आपल्या वडील व भावाकडे रहात होती. तसेच तीचा पहील्या पती पासुन घटस्फोट झाला नव्हता त्यामुळे पिडीत महीलेने आरोपी सोबत लग्न करणास नकार दिला.

यानंतर अनेक वेळा आरोपी मनोज अब्दुले हा पिडीत महीलेकडे येऊन लग्न करण्यासाठी तीचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होता. जुलै 2024 मध्ये चौथ्या आठवड्यामध्ये दोन वेळा पिडीत महीलेवर आरोपी मनोज अब्दुले याने महीलेची इच्छा नसताना बळजबरीने अत्याचार केला. दि 1 ऑगस्ट 2024 रोजी महीलेस रस्त्यावर आडवुन तु माझ्या सोबत चल आसे म्हणाला त्यावेळी तीने नकार देताच त्याने शिवीगाळ करत मारहाण केली तसेच तु माझ्यासोबत आली नाही तर मी तुझे सोबत व्हीडिओ कॉल वर बोललेलो कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करुन तुझी बदनामी करेल असे म्हणाला. तसेच सदरचे व्हॉटसप व्हीडिओ कॉल रेकॉर्डींग पिडीत महीलेच्या भावाच्या मोबाईल मधे पाठवुन देखील तीची बदनामी केली.

या प्रकरणी दि 18 जुलै रोजी पिडीत महीला, वय 20 वर्षे हीने जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मनोज अब्दुले याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles