*राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत जामखेड विधानसभा* *अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात* *यांचा सदस्यत्वाचा राजीनामा*
*कर्जत जामखेडची राष्ट्रवादी म्हणजे* *बारामती अँग्रो कामगारसारखा* *राळेभात यांचा आरोप*
———————————————————–
*जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )*
जामखेड – २०१९ विधानसभा निवडणुकीत आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या प्रेरणेने आम्ही कॅबिनेट मंत्र्याला पराभूत करून रोहित पवार यांना आमदार म्हणून निवडून आणले. पण गेल्या साडेचार वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष न ठेवता बारामती अँग्रो लिमिटेड कामगारासारखी पक्षाची अवस्था केली. असा आरोप कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांनी करून आ. रोहीत पवार यांच्या एकाधिकार शाहीला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्यात्वाचा राजीनामा दिला. पुढील पंधरा दिवस मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यानंतर दोनच दिवसात पक्षप्रवेश निश्चित करू करून महायुतीने संधी मिळाली तर विधानसभा लढवू असे मत प्रा. मधुकर राळेभात यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर केली.
राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाला रामराम ठोकला. यावेळी माजी नगरसेवक मोहन पवार, डिगांबर चव्हाण, अमित जाधव, राष्ट्रवादी खर्डा शहराध्यक्ष महालिंग कोरे, राष्ट्रवादी कार्यकर्ते राजेंद्र वारे उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की,
आमदार रोहित पवार म्हणतात कर्जत जामखेडचा विकास केला फक्त प्रशासकीय इमारती बांधल्या म्हणजे विकास नव्हे. दवाखाने बांधले पण डॉक्टर नाहीत. पंचायत समिती इमारत झाली पण मोठ्या प्रमाणावर विहीर व रोजगार हमी योजना कामात भ्रष्टाचार झाला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात अनेक अडीअडचणीचा सामना सामान्य माणसाला करावा लागत आहे. आमदार पवार पक्षातील कार्यकर्त्यांना कसलीही किंमत देत त्याचबरोबर मित्र पक्ष शिवसेना व काँग्रेस पक्षाला कसलीही किंमत देत नाही त्यामुळे सर्वजण नाराज आहेत. कार्यकर्त्यांना बारामती अँग्रोचे कर्मचारी समजतात. अनेकांना दम देतात. ज्यांनी पक्षासाठी आयुष्यभर काम केले त्यांना कसलीही किंमत देत नाहीत. हुकुमशाही पद्धतीने वागतात. २०२४ ची विधानसभा निवडणूक स्थानिक विरुद्ध बाहेरचा अशीच होईल. रोहित पवार यांच्या विरोधात स्थानिक सर्व नेते एकत्र राहणार आहेत. पैसे व साहित्य वाटून आमदार होता येत नाही हे पवारांनी लक्षात ठेवावे.
प्रतिनिधी नासीर पठाण सह पत्रकार आशोक निमोणकर जामखेड .