भाजपाचे विधान परिषेदेचे आमदार राम शिंदे यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून फलक एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या प्रकाराची नगर जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याआधी असाच प्रकार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहीबाबतीत घडला होता.
आमदार राम शिंदे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून एक पोस्ट व्हायरल झाली आहे. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून राम शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर पोस्टही केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा भावी मुख्यमंत्रीच्या पोस्टवरून चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्यात आगामी काळात लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका होणार आहे. राजकीय नेतेमंडळी बरोबरच आता कार्यकर्ते देखील निवडणुकांच्या तयारीला लागले आहे. यातच काही दिवसांपासून राज्यात भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्ते आपल्या नेत्यांची बॅनर झळकवत आहे. नगर जिल्हयातील लोकप्रतिनिधी देखील मागे राहिले नाही. रोहित पवार, राधाकृष्ण विखे यांच्यापाठोपाठ आता भाजपचे आमदार राम शिदे यांचे देखील भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्ट एका कार्यकर्त्याने व्हायरल केली आहे.