महाराष्ट्राला रोहित पवारांसारखा शिक्षणमंत्री मिळाल्यास मुलांचे भविष्य उज्ज्वल, ‘आप’च्या मनिष सिसोदियांकडून तोंडभरुन कौतुक
जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )
जामखेड – रोहित पवार यांच्यासारखा आमदार तुम्हाला मिळाला हे तुमचं सौभाग्य आहे, कोणता आमदार शिक्षणासाठी कोणी प्रयत्न करत नाही, रोहित पवार पुर्ण ताकतीने शिक्षणासाठी प्रयत्न करताना दिसत आहे, ते आताच इतका प्रयत्न करतात तर विचार करा रोहित पवारांसारखा शिक्षणमंत्री महाराष्ट्राला मिळाला तर मुलांचे भविष्य उज्ज्वल बनेल, ते शिक्षणासाठी किती काम करतील. या आमदाराला कधी गमावू नको, आमदार रोहित पवार हे खूप कामाचे आहेत, चांगला माणूस आहे, यासाठी नाही तर तुमच्या मुलांचं उज्वल भविष्य हा आमदार घडवू शकतो असे प्रतिपादन दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांनी केले.
जामखेड येथील जिल्हा परिषद शाळेच्या दहा खोल्यांचे उद्घाटन दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे प्रवक्ते नितेश कराळे मास्तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, सभापती जयश्री मोरे, युवा नेते रमेश आजबे, शहराध्यक्ष वसीम शेख, युवक तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात, प्रकाश काळे, हनुमंत पाटील, रामहरी गोपाळघरे, सुरेश भोसले, वैजीनाथ पोले आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमावेळी बोलताना मनिष सिसोदिया यांनी भाजपसह केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. बिलियन डॉलर किंवा ट्रिलीयन डॉलर बद्दल कोणी बोलत असेल पण शिक्षणाबद्दल बोलत नसेल हे गृहीत धरा की ते तुम्हाला वेड्यात काढत आहेत. त्याचबरोबर यावेळी सिसोदियांनी म्हटलं जर या मुलांना चांगलं शिक्षण देता येत नसेल तर जुमले बांधूनच मतदान मागत असतील असा हल्लाबोल त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. मी देखील एका शिक्षक पेशा असलेल्या कुटुंबातून आलो आहे. उत्तर प्रदेशातील एका गावातून मी आलो, मी पुढे शिक्षण घेऊन दिल्लीत आलो, मंत्री झालो, अरविंद केजरीवालांनी मला शिक्षणमंत्री पदी काम करण्याची संधी दिली.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितेश कराळे मास्तर व आ. रोहीत पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
माझे विरोधक (राम शिंदे) म्हणतात रोहित पवार मुलांना चॉकलेट देतो. मी माझ्या लहान भावा-बहिणीला चॉकलेट देत असेल तर तुम्हाला वाईट का वाटते? नको त्या गोष्टींवरून राजकारण करू नये. मी राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले. मी माझे केस काळे करत नाही, पण काही जण केस काळे करतात आणि तरुणांसारखे ड्रेस घालतात. त्यांना तरुणाविरोधात निवडणूक लढवायची आहे, असं म्हणत रोहित पवारांनी नाव न घेता राम शिंदेंना टोला लगावला.
सिसोदियांनी रोहित पवारांचं केलं कौतुक
रोहित पवारांसारखा शिक्षणमंत्री महाराष्ट्राला मिळाला तर मुलांचे भविष्य उज्ज्वल बनेल. रोहित पवार यांना जनतेने गमावू नये. त्यांच्यासारखा नेता तुम्हाला मिळाला आहे त्यांना गमावू नका. रोहित पवार पुर्ण ताकतीने शिक्षणासाठी प्रयत्न करताना दिसत आहे, ते आताच इतका प्रयत्न करतात तर विचार करा रोहित पवारांसारखा शिक्षणमंत्री महाराष्ट्राला मिळाला तर मुलांचे भविष्य उज्ज्वल बनेल, ते शिक्षणासाठी किती काम करतील. या आमदाराला कधी गमावू नको, आमदार रोहित पवार हे खूप कामाचे आहेत, चांगला माणूस आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.