Monday, September 16, 2024

विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर; ३ टप्प्यात होणार मतदान

केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर २०१४ नंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका होत असून आज निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या. जम्मू काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर या तीन टप्प्यात मतदान होणार आहे. तर 4 ऑक्टोबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. अमरनाथ यात्रा १९ ऑगस्ट रोजी संपणार आहे, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जम्मू काश्मीरमध्ये निवडणुकीची धामधूम सुरु होणार आहे. निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी माहिती दिली

लोकसभा निवडणूक 2024 ही या वेळची सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया होती. देशभरात निवडणुकीचं पर्व आनंदात साजर झालं. आपल्या लोकसभा निवडणुकीने जगभरात एक चांगला संदेश गेला आहे. जम्मू काश्मीर आणि हरियाणा दोन्ही राज्यात आयोगाने दौरा केला. तिथे अनेक लोकांशी आम्ही चर्चा केली. सगळ्या राजकीय पक्षांसोबत चर्चा केली, त्यांनी लवकरात लवकर निवडणुका घेण्याची विनंती केली. जम्मू काश्मीरमधे लोकसभा निवडणुकीवेळी लोकांनी मोठ्या रांगा लावून मतदान केलं. जम्मू काश्मीरच्या लोकांनी बुलेट ऐवजी बॅलेट निवडलं, असं निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत. 2014 मध्ये येथे शेवटची विधानसभा निवडणूक झाली होती. यावेळी जम्मू काश्मीरमधे 90 जागा आहेत, त्यामधील 74 जागा जनरल आहेत. बाकी जागा आरक्षित आहेत. जम्मू काश्मीरमध्ये एकूण 87.09 लाख मतदार आहेत, 3.71 लाख मतदार हे पहिल्यांदा मतदान करतील.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles