उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रवादी काँग्रेसने जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि जम्मू-काश्मीरचे प्रभारी ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिली.
पुलवामा जिल्ह्यात निवडणूक लढवण्यासाठी तीन उमेदवारांच्या नावांना मान्यता दिली आहे. त्यानुसार, त्राल मतदारसंघातून मोहम्मद युसूफ हजम, पुलवामा विधानसभा क्षेत्रातून इश्तियाक अहमद शेख आणि राजपुरा विधानसभेसाठी घड्याळाच्या चिन्हावर अरुण कुमार रैना यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हे सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.