अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने नुकतीच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये तिची बहीण खुशी कपूरबरोबर हजेरी लावली. या शोमध्ये तिने वैयक्तिक आयुष्यासंदर्भात अनेक खुलासे केलेत. तसेच तिने शिखर पहारियाबरोबरच्या नात्यावरही भाष्य केलं. तिने शिखरबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली आहे.
शिखर कठीण काळात आधार बनून नेहमीच सोबत होता. त्याने कोणतीही अपेक्षा न ठेवता कायम पाठिंबा दिला. तो फक्त माझाच नाही तर माझ्या कुटुंबाचाही आधार आहे. मी शिखरशी ब्रेकअप झाल्यानंतर दुसऱ्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होते, पण आता पुन्हा शिखरसोबत आहे, असं जान्हवी कपूरने या शोमध्ये सांगितलं. अशातच आता तिचा शिखरबरोबरचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
जान्हवी कपूरने शिखर पहारियाबरोबर आंध्र प्रदेशमधील तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात जाऊन प्रार्थना केली. तिचा व शिखरचा दर्शनाला जातानाचा व्हिडीओ ‘एएनआय’ने शेअर केला आहे. व्हिडीओत जान्हवीने सोनेरी रंगाची साडी नेसली आहे, तर शिखरने लुंगी परिधान केली आहे. दोघांचाही हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.शिखर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पहारिया यांचा तो मुलगा आहे. दरम्यान, यापूर्वी अनेकदा शिखर व जान्हवी एकत्र देवदर्शनाला गेल्याचं पाहायला मिळालं. यापूर्वी ते उज्जैनमध्ये महाकालच्या दर्शनाला एकत्र गेले होते, तसेच ते तिरुपतीला एकत्र गेल्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता.
#WATCH | Andhra Pradesh | Actress Janhvi Kapoor visits Sri Venkateswara Swami Temple in Tirumala to offer prayers. pic.twitter.com/ujbv32kNM7
— ANI (@ANI) January 5, 2024