अभिनेता शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘जवान’ या चित्रपटाचा प्रीव्ह्यू व्हिडीओ सोमवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. दाक्षिणात्य दिग्दर्शक अटलीने पहिल्यांदाच या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. जवळपास दशकभरानंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर खलनायकी छटा असलेली भूमिका साकारत आहे.
ॲक्शन सीन्सचा भरणा असलेल्या या प्रीव्ह्यू व्हिडीओला जबरदस्त प्रतिसाद मिळत असून अवघ्या 24 तासांत त्याने नवा विक्रम रचला आहे. 24 तासांच्या आत या व्हिडीओला एक कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.