भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. ग्रेग बार्कले यांच्यानंतर जय शहा हे पद सांभाळणार आहेत. आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करणारे जय शहा हे एकमेव अर्जदार होते. यातच निवडणूक न होता जय शहा यांची बिनविरोध निवड झाली आहे.
आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यांनी सलग दुसऱ्यांदा हे पद भूषवले आहे. मात्र यंदा त्यांनी स्वतःला या शर्यतीपासून दूर केलं आहे. अशातच जय शहा यांची आज आयसीसीच्या अध्यक्षपदाची निवड झाली आहे.
आयसीसी अध्यक्ष प्रत्येकी दोन वर्षांच्या तीन टर्मसाठी पात्र असतो. न्यूझीलंडचे वकील ग्रेग बार्कले यांनी आतापर्यंत 4 वर्षे पूर्ण केली आहेत. बार्कले यांची नोव्हेंबर 2020 मध्ये आयसीसीचे स्वतंत्र अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2022 मध्ये त्यांची या पदावर पुन्हा निवड झाली होती.
https://www.icc-cricket.com/news/jay-shah-elected-unopposed-as-independent-chair-of-icc?sf199132962=1