Tuesday, February 18, 2025

जायकवाडी धरण भरले! धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पैठण येथील जायकवाडी (नाथ सागर ) जलाशयात सोमवार दि २ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत ८७. ०३ एवढा पाणी साठा उपलब्ध झाल्याने व धरण प्रकल्प क्षेत्रासह इतरही ठिकाणी अजूनही मोठ्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

धरण प्रकल्पा ची सर्व यंत्रणा सज्ज झाली असून धरणात अजूनही वाढत्या पाण्याची आवक लक्षात घेता गोदावरी पात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला असल्याने गोदावरी पात्रालगतच्या गावांनी सतर्क राहण्या बाबतच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

या बाबतचे लेखी पत्र कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग नाथ सागर उत्तर पैठण यांच्या स्वाक्षरीने छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड व अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील फक्त मुंगी हेच एकमेव गाव गोदावरी तिरावर असल्याने या गावातील नागरिकांनाही तशा सतर्क राहण्याबाबतच्या सूचना तहसील कार्यालयामार्फत देण्यात आल्या आहेत.

पैठण जायकवाडी (नाथ सागर) धरण राज्यात पाणी साठ्याबाबतचे २ नंबरचे धरण रेकॉर्डवर असून या धरणाची पाणी क्षमता १०२ टी एम सी असून त्यामध्ये ७६ टक्के साठा हा जिवन्त तर २६ टक्के साठा मृत धरण क्षेत्राच्या दप्तरी नोंदला गेलेला आहे.तसेच या धरणातून २७ मोऱ्यांच्या गोदावरी पात्रासह डावा व उजवा असे दोन कालवे गेलेले असून त्यामध्ये डावा कालवा हा नांदेड पर्यंत २१० की मी या खूप मोठ्या अंतराने गेलेला असून उजवा कालवा माजलगाव पर्यंत १३२ कीमी अंतराने नेण्यात आला असून तेथील ११ टी एम सी च्या धरणात तो झिरो करण्यात आलेला आहे.

सध्या या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सूरू असून तेथील माजलगाव धरण भरून घेतले जाणार आहे. चालू पावसाळ्याच्या हंगामापूर्वी या धरणातील जिवन्त साठा अवघ्या ५ टक्क्यावर येऊन ठेपला होता.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles