छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रविवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असल्याने नाथसागरात ३४ हजार ३३८ क्युसेकने पाण्यामी आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाचा एकूण पाणीसाठा ८७.०३ टक्के इतका झाला आहे.
गेल्या आठवड्यात नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गंगापूरसह इतर धरणांमधून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परिणामी जायकवाडीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. त्यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रविवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असल्याने नाथसागरात ३४ हजार ३३८ क्युसेकने पाण्यामी आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाचा एकूण पाणीसाठा ८७.०३ टक्के इतका झाला आहे.
अशातच कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात विसर्ग केला जाऊ शकतो, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक बघता त्याअनुषंगाने रविवारी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीवर धरणाचे दरवाजे उघडण्यावर चर्चा झाली आहे. या संदर्भात एक पत्रही अधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आले.